सन्मानपत्र

कणेरीमठ, कोल्हापूर येथे सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कार्बन न्यूट्रल प्रदर्शन दालन स्थापन करण्यात आले आहे. हा एक नाविण्यपुर्ण, प्रभावी, स्त्युत उपक्रम असुन कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने केलेला हा उपक्रम गौरवास प्राप्त ठरला आहे. हे दालन संतुलित कार्बन राखण्याचा नवीन पायंडा घालुन देत आहे. या शाश्वत उपक्रमासाठी सौरउर्जा यंत्रणेचा वापर पुढील २० वर्षांसाठी करून तसेच २०० झाडांमार्फत कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण करण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे निर्माण होणाऱ्या २३,५२० किलो कार्बनपैकी १,४९,३४० किलो कार्बनचे उत्सर्जन रोखण्यात येणार आहे.